शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी
सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत एक मोठा निर्णय घेतला आहे. PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना थोडा श्वास मिळणार आहे.
एकूण किती रक्कम मिळणार?
या दोन्ही योजनांमधून एकूण ४,००० रुपये मिळणार आहेत:
- पीएम किसान योजनेतून – ₹2,000
- नमो शेतकरी योजनेतून – ₹2,000
हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील. मात्र रक्कम दोन टप्प्यांत दिली जाईल.
कोणत्या जिल्ह्यांना पहिले मिळणार पैसे?
प्रथम टप्प्यात खालील 18 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पैसे मिळणार:
नांदेड, संभाजीनगर, जालना, लातूर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहमदनगर, चंद्रपूर
या जिल्ह्यांतील लाभार्थ्यांच्या खात्यात दुपारी ३ वाजेपर्यंत पैसे जमा होतील. इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पुढील ४-५ दिवसांत पैसे मिळतील.
SMS द्वारे मिळेल माहिती
जेव्हा पैसे खात्यात जमा होतील, तेव्हा शेतकऱ्यांना SMS द्वारे याची माहिती दिली जाईल.
पात्रतेचे नियम कोणते?
सर्वांना पैसे मिळणार नाहीत. खालील अटी पूर्ण केल्यासच लाभ मिळेल:
✅ eKYC पूर्ण असणे
✅ आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे
✅ कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नसणे
✅ वार्षिक उत्पन्न ₹5 लाखांपेक्षा कमी
✅ शेतजमीन 10 एकरांपेक्षा कमी
या बँकांमध्ये खातं असेल तरच पैसे मिळणार:
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
- बँक ऑफ महाराष्ट्र
- पंजाब नॅशनल बँक
- HDFC बँक
- ICICI बँक
- कॅनरा बँक
- युनियन बँक
- बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ बडोदा
- पोस्ट ऑफिस बँक
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
पेरणीच्या हंगामात खतं, बियाणं, औषधं यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी हे पैसे उपयुक्त ठरणार आहेत. मागील ४ महिन्यांपासून शेतकरी प्रतीक्षेत होते. त्यामुळे ही बातमी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारी ठरणार आहे.