---Advertisement---

Maharastra Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा धडाका! कोकण, घाटमाथा, विदर्भात रेड अलर्ट, मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज

On: July 26, 2025 7:12 AM
Follow Us:
Maharastra Rain Update
---Advertisement---

Maharastra Rain Update : राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जबरदस्त जोर पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने आगामी तीन दिवसांसाठी अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

आज पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. इतर विदर्भातील जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.

कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाड्यात बीड, लातूर, परभणी, धाराशीव, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (उद्या) देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट तर इतर भागांमध्ये येलो अलर्ट लागू करण्यात आले आहेत.

शनिवारीही कोकण, घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहील. विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड येथे जोरदार पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळतील.

सूचना: नागरिकांनी हवामान विभागाच्या इशाऱ्याकडे लक्ष द्यावं आणि आवश्यक काळजी घ्यावी. शेती, वाहतूक आणि सार्वजनिक जीवनावर याचा परिणाम होऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment