राशन कार्डमध्ये (Ration Card) नवीन सदस्याचं नाव जोडणं हे आता अधिक सुलभ आणि सोपं झालं आहे. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीनं ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. घरात मुलगा जन्माला आल्यावर, सून नव्याने घरी आल्यानंतर किंवा कुटुंबात इतर कोणतीही व्यक्ती सामील झाल्यावर त्यांचं नाव सहजपणे राशन कार्डात समाविष्ट करता येतं.
आवश्यक कागदपत्रं
मुलासाठी नाव जोडताना:
- कुटुंब प्रमुखाचं राशन कार्ड
- मुलाचं जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
- आई वडिलांचे आधार कार्ड
सूनसाठी नाव जोडताना:
- विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate)
- पतीचं राशन कार्ड
- महिलेचं आधार कार्ड
- मुलीच्या राशन कार्डातून नाव हटवण्याचा पुरावा (जर लागू असेल)
ऑनलाइन नाव जोडण्याची प्रक्रिया:
- राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- Login किंवा Registration करा.
- “Add Member” किंवा “नवीन सदस्य जोडा” या पर्यायावर क्लिक करा.
- फॉर्म भरा – नाव, जन्मतारीख, नाते, आधार नंबर इ. माहिती द्या.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (PDF/जpg स्वरूपात).
- फॉर्म सबमिट करा – नोंदणी क्रमांक मिळेल.
- तुम्ही हा फॉर्म पुढे ट्रॅकही करू शकता.
- सत्यापन पूर्ण झाल्यावर नवीन राशन कार्ड पोस्टाने मिळेल.
ऑफलाइन प्रक्रिया:
- जवळच्या तालुका अन्न पुरवठा कार्यालयात जा.
- नाव जोडण्यासाठीचा अर्ज घ्या आणि भरून घ्या.
- सर्व आवश्यक कागदपत्रे संलग्न करा.
- फॉर्म विभागात जमा करा. काही ठिकाणी फी लागू शकते.
- एक पावती (Receipt) मिळेल – ती जपून ठेवा.
- २ आठवड्यांच्या आत फॉर्म तपासून राशन कार्ड पाठवलं जातं.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q1: नाव जोडण्यासाठी किती वेळ लागतो?
A: ऑनलाईन किंवा ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण करून साधारण १-२ आठवड्यांत नाव जोडले जाते.
Q2: घरातल्या सर्व सदस्यांसाठी हीच प्रक्रिया आहे का?
A: होय, कोणताही नवीन सदस्य जोडण्यासाठी ही प्रक्रिया लागू होते.
Q3: कागदपत्र अपूर्ण असतील तर काय होईल?
A: फॉर्म अमान्य होऊ शकतो. म्हणून सर्व कागदपत्रे बरोबर सादर करावीत.
सूचना: ही माहिती संकलनाच्या वेळेसची आहे. संबंधित राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून अधिक माहिती आणि बदल तपासून घ्या.