शेतीत यशस्वी होण्यासाठी ट्रॅक्टरसारखी आधुनिक यंत्रसामग्री आवश्यक आहे. पण ट्रॅक्टर खरेदीचा मोठा खर्च अनेक शेतकऱ्यांना परवडत नाही. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना 2025 सुरु केली आहे.
या योजनेंतर्गत 8 ते 70 HP पर्यंतच्या ट्रॅक्टरसाठी 40% ते 50% अनुदान दिलं जातं — ज्यामुळे 75,000 ते 1.25 लाख रुपयांपर्यंत मदत मिळू शकते!
🌾 या योजनेचे फायदे
- ट्रॅक्टर खरेदीवर 50% पर्यंत अनुदान
- शेतीचा खर्च कमी, उत्पादनात वाढ
- सबसिडी थेट बँक खात्यात जमा
- अर्ज प्रक्रिया फ्री – कोणतेही शुल्क नाही
🎯 कोण पात्र आहे? (पात्रता)
✅ भारतीय नागरिक असावा
✅ शेतकरी असावा व शेतीयोग्य जमीन असावी
✅ वार्षिक उत्पन्न ₹2 लाखांपेक्षा कमी
✅ याआधी कोणत्याही ट्रॅक्टर सबसिडीचा लाभ घेतलेला नसावा
✅ पीएम किसान योजनेत नाव असलेल्यांना प्राधान्य
✅ अर्जदाराकडे याआधी स्वतःचा ट्रॅक्टर नसावा
📋 लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- 7/12 व 8A उतारे
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- पासपोर्ट साइज फोटो
- मोबाईल नंबर आणि ईमेल
- स्वखर्ची प्रतिज्ञापत्र
💰 ट्रॅक्टर क्षमतेनुसार मिळणारे अनुदान
ट्रॅक्टर HP | अनुदान टक्केवारी | संभाव्य मदत |
---|---|---|
8–20 HP | 40% | ₹75,000 पर्यंत |
20–40 HP | 45% | ₹1,00,000 पर्यंत |
40–70 HP | 50% | ₹1,25,000 पर्यंत |
📝 अर्ज कसा कराल?
✔️ ऑफलाइन अर्ज:
- आपल्या जिल्ह्यातील कृषी कार्यालयात जा
- अर्ज फॉर्म भरा व कागदपत्रांसह जमा करा
- पावती मिळवा व पुढील अपडेटसाठी संपर्कात रहा
✔️ ऑनलाइन अर्ज:
🔗 mahadbt पोर्टल वर जा
- नवीन युजर असल्यास नोंदणी करा
- ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज निवडा
- सर्व माहिती भरा, कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज सबमिट करा व अर्ज क्रमांक जतन करा
📢 महत्त्वाची टीप:
योजना मर्यादित काळासाठी असून, लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
👉 ही योजना शेतीत यंत्रसामग्रीची गुंतवणूक सोपी करून, उत्पन्न वाढवण्यासाठी मोठी संधी आहे.